आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॅग'च्या अहवालामध्ये अजित पवारांची प्रशंसा:अर्थमंत्री म्हणून कोरोना काळात केलेले काम व आर्थिक शिस्तीचे केले कौतुक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते, तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोरोना काळात केलेल्या कार्याचे तसेच त्यांच्या आर्थिक शिस्तीचं 'कॅग' रिपोर्टमध्ये कौतुक करण्यात आले आहे.

तत्कालिन वित्तमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्याला 2020-2021 मध्ये राजकोषीय तूट तीन टक्क्यांखाली म्हणजे 2.69 टक्क्यांपर्यंत आणण्यात राज्याला यश मिळाल्याचे अहवाल नमूद करण्यात आले आहे.

कॅगचा अहवाल सादर

विधानसभेत आज 'कॅग'चा अहवाल मांडण्यात आला. या अहवालानुसार राज्यावरचे कर्ज 2016-17 मध्ये 4 लाख कोटी एवढे होते. ते आता पाच लाख 48 हजार 176 कोटी झाल्याचे म्हटले आहे. अहवालामध्ये तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात राबविलेल्या आर्थिक शिस्तीचे कौतुक केले आहे.

42 लाख कोटींची उपयोगिता प्रमाणपत्रे थकित

कॅगच्या अहवालानुसार 30 जून 2021 रोजी 2019-20 पर्यंत जारी केलेल्या अनुदानाच्या संदर्भात एकूण 42,861.97 कोटींची उपयोगिता प्रमाणपत्रे थकित होते. उपयोगिता प्रमाणपत्रांच्या अभावी प्राप्तकर्त्यानी उपयोग अपेक्षित प्रयोजनासाठी केला की नाही हे लेखापरीक्षणाला निश्चित करता आले नाही.

42 हजार कोटींची उपयोगिता प्रमाणपत्रे थकित

कॅगच्या अहवालानुसार 30 जून 2021 रोजी 2019-20 पर्यंत जारी केलेल्या अनुदानाच्या संदर्भात एकूण 42,861.97 कोटींची उपयोगिता प्रमाणपत्रे थकित होते. उपयोगिता प्रमाणपत्रांच्या अभावी प्राप्तकर्त्यानी उपयोग अपेक्षित प्रयोजनासाठी केला की नाही हे लेखापरीक्षणाला निश्चित करता आले नाही.

पाच वर्षांत केवळ दोनदा नफ्याचे बजेट

2016-21 या पाच वर्षांत फक्त दोनदा राज्याचा अर्थसंकल्प महसुली अधिशेषचा होता. 2019-20 मध्ये 17,116 कोटी रुपयांची महसुली तूट वाढून 2020-21 मध्ये 41,142 कोटी रुपये झाली. सगळ्यात आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे 2020-21 मध्ये राज्याच्या जीडीपी च्या तुलनेत राजकोषीय दायित्वे 20.15% इतकी होती. हे महाराष्ट्र राजकोषीय उतरदायित्व आणि अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम 2005 मध्ये निर्धारित केलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्त होते.

बातम्या आणखी आहेत...