आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडळकरांची टीका म्हणजे विनाशकाले विपरीतबुद्धी:'प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊनही पठ्ठ्याचे डिपॉझिट जप्त होते, त्याची कशाला नोंद घेता' - अजित पवार

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बारामती विधानसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकरांचे डिपॉझिट झाले होते जप्त

जेजुरी संस्थानाच्या वतीने जेजुरीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उद्या होणार होते. मात्र त्यापूर्वीच भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुतळ्याचे अनावरण केल्याचे जाहीर केले. यावेळी पडकरांनी पवार कुटुंबावर टीकाही केली आहे. आता याला अजित पवारांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिले आहे.

पडळकरांनी पवार कुटुंबावर केलेल्या टीकेवर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचली आहे. ज्यांचे डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांची काय एवढी नोंद घेताय तुम्ही, ते उभे राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाहीये. भाजपसारख्या प्रमुख पक्षाचे तिकीट घेऊनही पठ्ठ्याचे डिपॉझिट जप्त होते. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारत आहात, काय महत्त्व देताय' असा टोला अजित पवारांनी पडळकरांना लगावला आहे.

पडळकर म्हणाले होते...
यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, भारताचे दैवत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जेजुरी संस्थानाने उभारला आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी उपेक्षित समुदायासाठी मोठे काम केले आहे. पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे ठरवलं होते. पण महाराष्ट्रातील आमच्यासारख्या अनेक युवामित्रांचे म्हणणे होतं की शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी, वाईट प्रवृत्तीच्या हस्ते उद्घाटन होणे हे अहिल्यादेवींचा अपमान होण्यासारखे आहे. आमचा पुतळा अनावरणाला विरोध नाही. मात्र भ्रष्ट माणसाचे हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लागू नये', असे पडळकर यांनी म्हटले आहे.

बारामती विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट झाले होते जप्त
महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामतीतून भाजपला पराभूत केले होते. भाजपने बारामतीतूनअजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकरांना उभे केले होते. मात्र, अजित पवारांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह उर्वरित सर्वच उमेदवारांना पराभवाची धूळ चारली होती. पडळकरांसोबतच सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट देखील जप्त झाले होते.

बातम्या आणखी आहेत...