आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरकारने मनात आणले तर तोडगा काढू शकते. राज्यातील कर्मचाऱ्यांना जुने पेन्शन लागू झाले पाहीजेअसे भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे. नवीन पेन्शनमुळे 2005 नंतर सेवेत आलेल्यांना फटका बसला आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी, सरकारने सर्वांना विश्वासात घेऊन काम करायला हवे.अन्य राज्यामधे योजना लागू झाल्याने आपल्याकडेही मागणी करण्यात आली आहे. छोट्या राज्यांना जर परवडत असेल तर आपल्याकडेही योजना लागू करायला हवी असे मत त्यांनी व्यक्त केले. कर्मचारी आणि सरकारने समजंसपणा दाखवायला हवा, राज्यातील संपामुळे विद्यार्थी, आरोग्यविभागासह सर्वांनाच त्रास होईल असे अजित पवारांनी म्हटले आहे.
अजित पवार यापुढे बोलताना म्हणाले की, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी संपामुळे अत्यावश्यक सेवा बंद पडल्याचे रिपोर्ट येत आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. सरकारने या आंदोलनावर मार्ग काढला पाहिजे. पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करावी असे अजित पवारांनी म्हटले आहे. काही छोट्या राज्यांनी जर सुरू केली ती कोणत्या पद्धतीने कशी केली. त्यांना जर परवडत असेल तर महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे असे म्हणत ही योजना सुरू करण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे.
दोघांनीही समजूतदारपणा दाखवावा
3 राज्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे, आमचे सरकार असते तर आम्ही तो निर्णय घेतला असता असे अजित पवारांनी म्हटले आहे. भविष्याच्या काळजीने सरकार चिंतीत आहेत. पेपर तपासणार नाही, आरोग्य यंत्रणा बंद आहे, या सर्वांमुळे जनतेला त्रास होईल म्हणून दोघांनीही समजूतदारपणा दाखवावा असे मत अजित पवारांनी व्यक्त केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.