आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलखोल:अजित पवारांचा नवा घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पवारांचा घोटाळा 5 हजार कोटींपेक्षा मोठा असल्याचा दावा

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे पडले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचे जाहीर केले. प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.

“बुधवारी मी पुण्यात जाणार आहे. तेव्हा अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे. यांनी इतके घोटाळे केले आहेत, इतकी लूट माजवली आहे की मोजदाद करणे कठीण आहे,’ असे सोमय्या म्हणाले.

सोमय्या म्हणाले, अजित पवारांना माझा प्रश्न आहे की, जरंडेश्वरचा मालक कोण आहे? याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहीन. पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून छापे सुरू आहेत. हा घोटाळा पाच हजार कोटींपेक्षा मोठा आहे. त्यांना तुरुंगात जावेच लागेल. आपल्यावर कारवाई होईल असे आघाडी सरकारमधील नेत्यांना स्वप्नातही वाटले नसेल, पण मोदींनी ते करून दाखवल्याचा दावा सोमय्या यांनी केला. अजित पवार, हसन मुश्रीफ, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही, असे सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...