आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले - 'आमदार नियुक्तीचा निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी विनंती केली'

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त आहेत. अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना या आमदारांची यादी पाठवली होती. मात्र अनेक महिन्यांनंतरही यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान आज राज्यातील पाऊस आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अजित पवारांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपालांसोबत घेतलेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी चर्चेविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, 'गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला होता. मात्र त्यावेळी राज्यपालांना बाहेर जायचे असल्यामुळे भेटता आले नव्हते. भेटीसाठी त्यांनी आजची वेळ आम्हाला दिली होती. आम्ही आज राज्यपालांनी राज्यातील सध्याची परिस्थिती सांगितली. राज्या पावसामुळेअनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठवाडा, जळगाव, कन्नडमधील परिस्थितीची राज्यपालांना आम्ही माहिती दिली. यासोबत विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा ठराव कॅबिनेटने केला होता. परंतु अद्यापत त्यापुढील कारवाई झालेली नव्हती. यामुळे राज्यपालांना विनंती करण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे आलो होतो. कॅबिनेटने शिफारस केलेल्या 12 आमदारांच्या नियुक्तीवर लवकर निर्णय घेतला तर योग्य होईल. याविषयी योग्य निर्णय घेण्याचे राज्यपालांनी सांगितले'

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी विनंती केल्यानंतर राज्यपालांनी काय प्रतिक्रिया दिली याविषयीही अजित पवारांनी माहिती दिली. ते म्हणाले की, 12 आमदारांच्या यादीवर राज्यपालांनी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतलेला नाही. या नियुक्तीचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे आम्ही त्यांना केवळ विनंती केली की, हा प्रश्न लवकर सोडवला जावा. यावर राज्यपाल म्हणाले की, ठिक आहे, मी सगळे ऐकून घेतलेय, त्यामुळे मी यावर योग्य तो निर्णय घेईल.'

बातम्या आणखी आहेत...