आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चांना दिला पुर्णविराम:'केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार नाही', शरद पवार आणि प्रशांत किशोरांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशांत किशोर शरद पवार भेटीवर काय म्हणाले होते संजय राऊत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची नुकतीच भेट झाली. या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत यांनी शरद पवार यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. आता या भेटीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण संन्यास घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतरही प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. यानंतर अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांकडून 204 मध्ये भाजपाला तगडs आव्हान देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. असे असताना ही भेट झाल्याने प्रशांत किशोर राजकीय सल्लागार होणार काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरुन प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, प्रशांत किशोर यांनी स्वतः मी यापुढं रणनीतीकार म्हणून काम करणार नसल्याचे सांगितले आहे. यासोबतच शरद पवार वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटत असतात. आता प्रशांत किशोर यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामे असू शकतात. पण त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कोणतेही कारण नाही. यासोबतच केंद्रात किंवा राज्यात प्रशांत किशोर यांची मदत घेणार नसल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

प्रशांत किशोर शरद पवार भेटीवर काय म्हणाले होते संजय राऊत
प्रशांत किशोर हे एक राजकीय स्ट्रॅटेजिस्ट आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पडद्यामागून मदत केली होती. त्यात त्यांना यश देखील मिळाले. अनेक राष्ट्रीय नेते आणि पक्षांचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे पाहावे असे संजय राऊत म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...