आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांचे पुत्र पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये:पार्थ पवार वर्षा बंगल्यावर, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि विराेधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये दिसत आहेत. पार्थ यांनी बुधवारी (७ सप्टेंबर) वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. पार्थ हे वर्षा निवासस्थानी गेल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, एकीकडे भाजपने मिशन बारामती सुरू केले असतानाच पार्थ हे शिंदेंच्या निवासस्थानी गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पार्थ दुपारी चार वाजता जेव्हा मातोश्री निवासस्थानी गेले, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. पार्थ यांचे स्वागत मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत यांनी केले. पार्थ सुमारे ३० मिनिटे वर्षा येथे होते. श्रीकांत यांच्या निमंत्रणामुळे पार्थ गणपतीच्या दर्शनाला आले हाेते, असे समजते. पार्थ यांचे वडील अजित पवार यांनी भाजपबरोबर जात पहाटे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सध्या अजित पवार विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे पार्थच्या वर्षावर जाण्याने चर्चा होत आहेत. पार्थ सध्या मावळ मतदारसंघातील गणेशोत्सव मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेताना पाहायला मिळत आहेत. मावळ लोकसभेची सुरुवात असणाऱ्या खारघरमधील शंभूराजे मित्रमंडळ, कामोठे येथील स्वराज्य प्रतिष्ठान आणि पनवेल येथील एकता मित्रमंडळासह जवळपास दहाबारा मंडळांत जाऊन त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

राष्ट्रवादीचा एकही नेता वर्षावर नाही : मागच्या वर्षी राज्यात आघाडीचे सरकार होते. तेव्हा शरद पवार यांनी वर्षावर गणपतीच्या दर्शनाला हजेरी लावली होती. यंदा मात्र अद्याप राष्ट्रवादीचा कोणताही नेता वर्षावर फिरकलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...