आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MAHARERA च्या चेअरमनवर IT ची नजर:​​​​​​​नरीमन पॉइंट येथील एक फ्लॅट 5.33 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याच्या प्रकरणात आयकर विभागाच्या रडारवर अजोय मेहता

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहवालानुसार आयटी विभागाच्या बेनामी सेक्शनकडून एका केसचा खुलासा करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार आणि माजी अधिकारी अजोय मेहता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आयकर विभाग बेनामीच्या मालमत्ता अंतर्गत मेहतांच्या नरिमन पॉईंट फ्लॅटशी संबंधित डीलची चौकशी करत आहे. 1076 चौरस फुटांचा हा फ्लॅट 5.33 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता.

मेहतांना या वर्षी राज्य सरकारकडून प्रॉपर्टीची डिटेल व्हेरीफाय करणाऱ्या महारेरा (MAHARERA) चे चेअरमन बनवण्यात आले आहे.

अहवालानुसार आयटी विभागाच्या बेनामी सेक्शनकडून एका केसचा खुलासा करण्यात आला आहे. ज्यामध्ये नरिमन पॉईंटमध्ये प्रॉपर्टी डील करण्यात आली होती, ही डील शेल कंपनी आणि सेवानिवृत्त अधिकारी यांच्यात झाली होती. शेल कंपनीच्या नावावर हा फ्लॅट अनामित्रा प्रॉपर्टी प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आला होता. या कंपनीचे दोन भागीदार मुंबईतील चाळीत राहतात असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

आयटी विभागाला असा आला संशय
तपासात समोर आले आहे की, या शेल कंपनीकडून केवळ या फ्लॅटची डील झाली आहे. यामुळेच इनकम टॅक्स डिपार्टमेंटला या संशय आला आणि याचा तपास सुरू झाला. तपासणी दरम्यान, त्याच्या बॅलेन्स शीटमध्ये अनेक विसंगती आढळली आणि याच्या नॉन-फाइलर शेअरहोल्डर्सची माहिती मिळाली. यानंतर आयटी विभागाचे पथक या तपासणीत सामील झाले आणि ही मोठी चूक समोर आली.

कोण आहे अजॉय मेहता?
Maha RERA चे अध्यक्ष गौतम चटर्जी यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील 1984 बॅचचे अधिकारी अजॉय मेहता यांना अनेक मोठी नावे वगळून महारेराचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. यापूर्वी ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम करत होते. यापूर्वी मेहता यांनी राज्याचे मुख्य सचिव, मुंबई महानगरपालिका आयुक्त, ऊर्जा सचिव इत्यादी महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...