आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्याचे प्रकरण:अकबरुद्दीन ओवेसींचे कृत्य महाराष्ट्राला खिजवण्यासाठीच : खासदार संजय राऊत

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवेसींची औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होण्याची कृती महाराष्ट्राला खिजवण्यासाठी होती. यात महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा डाव आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. ओवेसी गुरुवारी शैक्षणिक संस्थेच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी औरंगाबादला आले होते.

राऊत म्हणाले, औरंगजेब साधू-संत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध त्याने लढाई लढली. औरंगजेबाला मराठ्यांनी मातीत गाडले, तुम्हालाही एक दिवस मातीतच जावे लागेल.

दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्वीटद्वारे अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. “पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर... आम्ही शिवरायांचे मावळे नाही,’ अशा जहरी शब्दांत आमदार राणे यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली.

संभाजीराजांचा अपमान करणाऱ्यांना औरंगजेबाशेजारी झोपवू
नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने चोवीस तास उलटूनही अकबरुद्दीन ओवेसींवर कारवाई केली नाही. आमच्या छातीवर तो नाचून गेला पण त्याच्यावर कारवाई केली गेली नाही. हे सर्व लोक आम्हाला चिथावणी देत आहेत. औरंगजेबाने स्वतःच्या आईवडिलांनाही सोडले नाही. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. संभाजीराजांचा अपमान करणाऱ्यांना औरंगजेबाच्या बाजूला झोपवल्याशिवाय राहणार नाही.