आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डॉक्टरने अत्यवस्थ अर्भकास स्कूटरवरून रुग्णालयात पोहोचवले, जीवही वाचवला

 मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • अलिबागमधील दांपत्यासाठी डॉक्टर ठरले देवदूत

डॉक्टर हे देवदूत असतात, ही उक्ती अलिबागमध्ये सार्थ ठरली आहे. एका नवजात अर्भकाला जन्माच्या काही तासांतच श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरने त्याला स्कूटरवरच मोठ्या रुग्णालयापर्यंत पोहोचवले. 

शुक्रवारी सकाळी अलिबागच्या श्वेता पाटील यांना प्रसूतीकळा सुरू झाल्या. लॉकडाऊनमुळे पती केतन यांनी त्यांना जवळच्याच नर्सिंग होममध्ये दाखल केले. यापूर्वी या दांपत्याचे पहिले बाळ जन्मानंतर लगेच दगावलेले असल्यामुळे त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत कसोटीचा होता. पती केतन म्हणाले, श्वेताला मधुमेह असल्यामुळे औषधे घ्यावी लागतात. तिची मेडिकल हिस्ट्री लक्षात घेऊन स्थानिक स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. राजेंद्र चांदोरकर यांना बोलावण्यात आले होते.

तू सुरक्षित आहेस... : डॉ. चांदोरकर म्हणाले, बाळास एनाआयसीयूत दाखल केले. त्याला अॉक्सिजन सपोर्ट दिला. १२ तासांनंतर त्याची प्रकृती स्थिर झाली. हा माझ्यासाठी अत्यंत कसोटी पाहणारा व तितकाच दिलासादायकही अनुभव ठरला. चाचण्या करत असताना बाळाने माझे बोट पकडून ठेवलेले होते. तू सुरक्षित आहेस अन् लवकरच बरा होशील, हेच मी त्याला सांगत होतो.

‘टीटीएन’मुळे बाळाची प्रकृती बिघडली होती 

सी-सेक्शनद्वारे ३.१ किलोच्या सुदृढ बाळाचा जन्म झाला. मात्र काही तासांतच श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या, शरीर निळे पडू लागले. या स्थितीस टीटीएन म्हटले जाते.  लॉकडाऊनमुळे कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. यामुळे बाळाला डॉक्टरच्याच दुचाकीवरून दीड किमीवर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...