आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवीगाळ आणि मारहाण प्रकरण:अलिबागचे सेना आमदार दळवींना दोन वर्षे कारावासाची शिक्षा

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यासह चौघांना शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. हे प्रकरण २०१३ मधील आहे. दरम्यान, दळवी यांचा जामीन मंजूर झाला आहे.

२०१३ मध्ये थळ येथे किरकोळ कारणावरुन मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार बाबू उर्फ सलीम लालासाहेब दिगी यांनी अलिबाग पोलिस ठाण्यात केली होती. त्यानुसार दळवी यांच्यासह अनिल हरिश‍चंद्र पाटील, अंकुश द्वारकानाथ पाटील, मनोहर काशिनाथ पाटील, स्वप्नील उर्फ पप्पू दिलीप पाटील, रुपेश रामदास पाटील, अविनाश लक्ष्मण म्हात्रे, मिलिंद द्वारकानाथ पाटील, राकेश रामदास पाटील सर्व राहणार वायशेत, थळ यांच्यावर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. निकाल देताना प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधिश विभा इंगळे यांनी अनिल पाटील, अंकुश द्वारकानाथ पाटील, अविनाश लक्ष्मण म्हात्रे, महेंद्र दळवी या चौघांना दोषी ठरवून २वर्षे आणि प्रत्येकी २७ हजार दंड सुनावला.

बातम्या आणखी आहेत...