आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मराठा आरक्षण मुद्द्यावर सर्वपक्षीय खासदार पंतप्रधान माेदींना भेटणार; पवारांचा पुढाकार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका असून यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढाकार घेणार असल्याची माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. अशोक चव्हाण यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत मराठा आरक्षणाबाबत सोमवारी झालेल्या वकिलांच्या बैठकीबाबत तसेच या प्रकरणाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली, असे चव्हाण पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रदेशाध्यक्षपदासाठी लॉबिंग
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हिंगोलीचे राजीव सातव यांना नवे प्रदेशाध्यक्ष करावे यासाठी पुढाकार घेतला आहे, तर चव्हाण हे विजय वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही आहेत. त्याबाबत पवार यांनी मदत करावी या भूमिकेतून चव्हाण यांनी पवारांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. नवा प्रदेशाध्यक्ष नेमताना काँग्रेस श्रेष्ठी पवारांशी सल्लामसलत करू शकतात, असे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...