आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना:राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत; अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचेही दिले आदेश

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आल्या असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या भागात पंचनाम्याचे दिले आदेश

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय त्या-त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोहचले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.

मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या-त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...