आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीची भूमिका:तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत, नवाब मलिकांनी स्पष्ट केली राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा कालही विरोध होता, आजही आहे आणि हा विरोध उद्या देखील राहणार

केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांविषयी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी याविषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिलेला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे, तसेच काही माध्यमांमधून उलटसुलट बातम्या प्रसारित करुन लोकांची दिशाभूल केली जात असल्याचेही मलिक म्हणाले.

केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचा कालही विरोध होता, आजही आहे आणि हा विरोध उद्या देखील राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिकांनी मांडली आहे. केंद्रीय कृषी कायद्याला विरोध न करता त्यांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. यावरुन मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विधानसभेमध्ये या कृषी कायद्यांविरोधात प्रस्ताव पारित करण्याचे सरकारकडून काम केले जाणार आहे. त्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली होती. ही समिती सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहे. यानंतर ती समिती शेतकऱ्यांच्या नेत्यांशी चर्चा करेल. नंतर मसुदा तयार करुन पुढचा निर्णय घ्यायचा आहे. शेतकऱ्यांना तो मसुदा मंजूर होणार नाही तोपर्यंत सरकार पुढे जाणार नसल्याचेही नवाब मलिक म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...