आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:आमदार सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप; दादरमध्ये शिवसैनिक आक्रमक,  शिंदे गटाच्या 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका निवडणुकाच्या तोंडवर शहरातील वातावरण तापले जात असून शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात जोराचे खटके उडत आहेत. त्यामधून रविवारी (ता. ११) दिवसभर शिवसैनिकांनी दादर पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या दिला होता. शेवटी पोलिसांनी नमते घेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांच्या गटातील ९ जणांवर गुन्हा दाखल केला. तसेच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

गणेश विसर्जनावेळी दादरच्या दोन्ही गटातील शिवसैनिकांत बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान शनिवारी रात्री एकमेकांना धमकावण्यात झाले. शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाचे शिवसैनिक महेश सावंत यांनी केला होता. मात्र पोलिसांनी ठाकरे गटातील २५ शिवसैनिकांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला व पाच शिवसैनिकांना अटक केली होती.

त्यामुळे सेना नेत्यांनी आज दादर पोलिस स्टेशन गाठले. त्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, माजी मंत्री अनिल परब, आमदार सुनील शिंदे, आमदार सचिन अहिर या सेना नेत्यांचा समवेश होता. शिंदे गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा तसेच सदा सरवणकर यांच्या गाेळीबाराची चौकशी करा, अशी त्यांची मागणी होती.

शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंकडून मातोश्रीवर कौतुक : शेवटी पोलिसांनी नमते घेत सदा सरवणकर, त्यांचे पुत्र स्थानिक नगरसेवक समाधान तसेच त्यांच्या गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांच्यासह १० जणांवर गुन्हा नोंदवला. ठाकरे गटातील शिवसैनिकांवर जबरी चोरी प्रकरणाचे कलम हटवण्यात आले आणि त्यांची जामिनावर सुटका केली. सायंकाळी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या शिवसैनिकांनी भेट घेतली. उद्धव यांनी या शिवसैनिकांचे कौतुक केले. दादरमध्ये शेजारच्या धारावीतील शिवसैनिकांची टीम मदतीला आली शिवसेना काय आहे ते दाखवू : खा. अरविंद सावंत आ. सरवणकर यांच्या पिस्तुलातून गोळीबार झाला. मात्र तक्रार दाखल करायला आलेल्या शिवसैनिकांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला.कधी विरोधकांना संपवण्याची भाषा करण्यात येते. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसैनिक शांत आहेत, असे खासदार अरविंद सावंत म्हणाले.

पोस्टवरून तेलवणेला बदडले ‘आवाज करणार तर ठोकणारच, आज पेंग्विन सेनेला स्वतःची लायकी समजलीच असेल,’ अशा प्रकारची साेशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे गटातील संतोष तेलवणे या कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली आहे. दादर-प्रभादेवी परिसरात या वेळी प्रचंड तणावाचे वातावरण होते.

गोळीबाराचा आरोप खोटा : सरवणकर आमदार सदा सरवणकर यांनी रात्री उशिरा पोलिस ठाण्याच्या आवाराबाहेर या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘गोळीबारासारखा काहीही प्रकार झालेला नाही. दोन कुटुंबात किरकोळ वाद होता. गोळीबाराचा खोटा आरोप लावण्यात आला आहे. कोणी काहीही आरोप करत आहेत.’

बातम्या आणखी आहेत...