आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Allow ST Employees To Return To Work. Then Take Action Against Them, Confidential Letter Of ST Corporation Revealed, Holi Of Letter From Padalkar, Khot

एसटी संप पेच:एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या, मग त्यांच्यावर कारवाई करा; एसटी महामंडळाचे गोपनीय पत्र उघड, पडळकर, खोत यांच्याकडून पत्राची होळी

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हायरल झालेले पत्र खोटे एसटी महामंडळाकडून स्पष्टोक्ती

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होऊ द्या. ते कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई करा, अशा आदेशाचे एसटी महामंडळाचे गोपनीय पत्र उघड झाले. या पत्राची भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी होळी केली. दुसरीकडे एसटी महामंडळाने हे पत्र चुकीचे असल्याचे सांगितले.

गोपीचंद पडळकर म्हणाले, या गोपनीय पत्रामुळे सरकारचा चेहरा उघड झाला. सरकारचे हे दुटप्पीपण आहे. कामगारांचा छळ करून एसटीत पैसे घेऊन जवळच्या लोकांना भरती करायचे आहे. अधिवेशनात आम्ही त्यावर आवाज उठवू असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. त्यांनी या पत्राची व अहवालाची होळी केली.

पत्राची चिरफाड करणार

एसटीचे गोपनीयतेचे पत्र आम्हाला उशिरा मिळाले. या पत्राची आम्ही चिरफाड करणार आहोत. सरकार दुटप्पी आहे. त्यांचा दुतोंडीपणा उघड करणार आहोत. हे गोपनीयतेचे पत्र आणि त्रिसदस्यीय समितीचा अहवाल कामगार विरोधी आहे. त्याची आम्ही होळी केली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारला कर्मचाऱ्यांचे शोषण करायचे

न्यायालयाने राष्ट्रवादीच्या एसटीतील संघटनेची मान्यता रद्द केली. सरकारला एसटी कर्मचाऱ्यांना उद्ध्वस्त करून त्यांचे शोषण करायचे आहे.सरकारचे षडयंत्र उघड करणार आहोत असेही पडळकर म्हणाले.

एसटी महामंडळाने हे पत्र चुकीचे असल्याचे सांगितले. त्यावर गोपनीय पत्र बाहेर पडणार नाही असे त्यांना वाटत होते. आता ते बाहेर आल्याने अधिकारी उघडे पडले आहेत. चुकीचे असेल तर संबंधितांवर कारवाई वेळीच का झाली नाही असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...