आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यावरून वांदा!:55 -70 मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार! नाफेडचे अजब माप, अंबादास दानवेंचा सभागृहात सवाल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याचे दर सातत्याने घसरत असून त्यामुळे शेतकऱ्यांवर रडायची वेळ आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असतानाच सरकारकडून कांद्यावरही फुलपट्टी लावली आहे. नाफेडने 55 - 70 मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया ताणल्या आहेत. याच मुद्यावरुन विधान परिषदेच्या सभागृहात अंबादास दानवेंनी सरकारला सवाल केला आहे. यावर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी दखल घेऊ असे म्हटले असून आता सरकारकडून काय उत्तर येते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्यात एकीकडे कांद्याचे भाव घसरत आहेत. रस्त्यावर कांदा फेकून शेतकरी आपला संताप व्यक्त करीत आहेत. या शेतकऱ्यांना हमी भाव मिळत नसल्याने ते चिंतेत असतानाच शेतकऱ्यांची नाफेडकडून थट्टाच केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

छोट्या कांद्याचे करायचे काय?

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तातडीच्या मुद्द्याद्वारे शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नाफेड जर 55 - 70 मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

कांदा उत्पादकाला आला 2 रुपयांचा चेक

दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्याला 2 रुपयांचा चेक आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री यांनी कोणत्याही अटी व शर्तीशिवाय नाफेड कांदा खरेदी करेल, असे सभागृहात म्हटले होते.

फडणवीस म्हणाले माहीती घेतो

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्येवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज मुद्दा उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. यात हा कांदा 55 ते 70 मिलिमीटरच असावा असे म्हटले मी म्हणतो की, जर त्यात आपल्याला काही माहीती देता आली तर द्या. या मुद्द्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेणार असल्याचे सांगितले.