आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यादी रद्द झाल्याने विरोधी पक्षनेते आक्रमक:अंबादास दानवेंचा राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल पक्षपातीपणे वागत असल्याचे सिद्ध होत आहे. ठाकरे सरकारने दिलेल्या नावांची यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. तसे केल्यास पुन्हा एकदा कोर्टात जाऊ, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांंनी दिला आहे.

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यममंत्री असताना एक यादी पाठवली होती. मात्र, आता सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना ही यादी रद्द करण्याचे पत्र पाठवले आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत.

गेल्या आठवड्यात शिंदेंनी हे पत्र राज्यपालांना पाठवल्याची माहिती आहे. याआधी ठाकरे सरकारने पाठवलेल्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी 4 जणांचा समावेश आहे. त्यामुळे ही यादी रद्द झाल्यास मविआतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांना धक्का बसणार आहे.

कोश्यारींवर सडकून टीका

महाविकास आघाडी सरकारने 2 वर्षांपूर्वी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे विधान परिषदेसाठी 12 सदस्यांची यादी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी अद्याप या नावांना मंजुरी दिलेली नाही. यावरुन अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर सडकून टीका करत असे केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेला विरोध

अंबादास दानवे म्हणाले, हे प्रकरण कोर्टात गेले होते. लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नव्हते. मात्र तशा सूचना केल्या होत्या. असे असताना ती यादी राज्यपालांना रद्द करता येणार नाही. अशाप्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आणि अशापद्धतीने होत असेल तर ते चुकीचे आहे. 2 वर्षे त्यांनी ही यादी पेडिंग ठेवली. ही यादी रद्द करता येणार नाही. हा कॅबिनेट निर्णय होता. आम्ही न्यायालयात जाऊ. जे जे काही करता येईल ते आम्ही करू. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेला आमचा विरोध असेल.

दसरा मेळावा शिवसेनेचाच

शिवतीर्थावरच्या मेळाव्याच हे 56 व वर्ष असेल. शिवसेनेच्या स्थापनेपासून हा मेळावा होत आहे. एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान हे शिवसेनेचे ब्रिदवाक्य राहिलेले आहे. कित्येकांनी झेंडे बदलले. कित्येक लोकांनी नेते बदलले. मात्र, शिवसेनेचा 1967 मध्ये शिवसेनेचा जो ध्वज होता आजही तोच आहे. नेताही तेच आहेत हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यामुळे मैदानही तेच राहणार आहे. शिवसैनिकांच्या मनात शंका येण्याचे कारण नाही.

संस्कृतीचे सोने दसऱ्याला लुटतो

शिवसेनेचा दसरा मेळावा हा काही एका राजकीय पक्षाचा मेळावा नसून महाराष्ट्राच्या विचारांचा, संस्कृतीचे सोने दसऱ्याला लुटतो. त्यामुळे संभ्रमित राहण्याचे कारण नाही.उद्धव ठाकरेंनी 12 नावे दिली होती. मात्र, राज्यपालांनी राजकारण करून या सगळ्या प्रक्रियेला वेळ लावला. शिंदे यांनी निर्माण केलेल्या शाखा थोतांड असतील. अशी टीकाही त्यांनी शिंदे गटावर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...