आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NIAच्या आरोपपत्रात खुलासा:सचिन वाझे दर महिन्याला कॉल गर्लला देत होता 50 हजार रुपये, महिलेने सांगितले- एकदा 76 लाखांच्या नोटा मोजून घेतल्या

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन वाझे एका कॉल गर्लला दर महिन्याला 50 हजार रुपये पगार देत होता. अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी दाखल केलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रात हे उघड झाले आहे. महिलेने एजन्सीला सांगितले की 2020 मध्ये तिने कॉल गर्लची नोकरी सोडली होती. तेव्हापासून तिला दर महिन्याला वाझेकडून पगार मिळत होती.

एनआयएच्या आरोपपत्रात याचा उल्लेख आहे. या महिलेने अधिकाऱ्यांना सांगितले होते की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये सचिन वाझे याने तिला मोजण्यासाठी एकूण 76 लाख रुपयांच्या नोटा दिल्या होत्या. महिलेचा दावा आहे की ती 2011 पासून सचिन वाझेला ओळखते.

एनआयएच्या चौकशी दरम्यान महिलेने सांगितले की सचिन वाझे याने तिला एका कंपनीत संचालक बनवले होते, परंतु या कंपनीच्या खात्यात 1.25 कोटी रुपये कुठून आले याची तिला माहिती नाही. तिने सांगितले की मला कंपनीच्या व्यवहारांबद्दल काहीच माहिती नाही. मी फक्त सचिन वाझे यांच्या सांगण्यावरून ब्लॅंक चेकवर सह्या करायचे धनादेशांवर स्वाक्षरी करायचे.

5 दिवसांपूर्वी एनआयएने दाखल केले होते आरोपपत्र
अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने 5 दिवसांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. 10,000 पानांच्या आरोपपत्रात सचिन वाझे याच्यासह 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपपत्रात असे म्हटले आहे की, मनसुखला मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते.

9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने काही लोकांची चौकशीसाठी दिल्लीला जाऊन चौकशीही केली आहे.

या 10 जणांना करण्यात आले आरोपी

  • सचिन हिंदुराव वाझे
  • नरेश रमनिक लाल
  • विनायक शिंदे
  • रियाझुद्दीन काझी
  • सुनील धर्मा
  • संतोष शेलार
  • आनंद पांडुरंग जाधव
  • सतीश तिरुपती
  • मनीष वसंत भाई सोनी
  • प्रदीप शर्मा

16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सचिन वाझेने रचला कट
25 फेब्रुवारी 2021 रोजी मुकेश अंबानींच्या घराजवळ उभ्या असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके सापडली असावीत, परंतु सचिन वाझेने जवळपास 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यानच त्याची योजना केली होती, कारण या पाच दिवसांसाठी वाझेने आपली ओळख लपवून ठेवली होती. फाइव्ह स्टार ओबेरॉय येथे तो थांबला होता. तपासादरम्यान, एनआयएला समजले की या पंचतारांकित हॉटेलमधील एक खोली वाझेने 100 रात्रीसाठी बुक केला होता

बातम्या आणखी आहेत...