आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई पोलिसातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझेच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा अॅंटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी तपास करत आहे. दरम्यान, सचिन वाझे दर महिन्याला एका कॉल गर्लला 50 रुपये पगार द्यायचा असा खुलासा एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये केला आहे.
महिलेने एनआयएला सांगितले की, तीने 2020 मध्ये कॉल गर्लचे काम सोडून दिल्यावर ही तीला महिन्याला वाझेकडून पगार मिळायचा. यावर्षी फेब्रुवारीमध्ये वाझेने संबंधित महिलेला 76 लाख रुपयांच्या नोटा मोजायला दिल्या होत्या. ती महिला वाझेला 2011 पासून ओळखत असल्याचे एनआयएने आपल्या चार्जशीटमध्ये दावा केला आहे.
कंपनीच्या व्यवहारांची माहिती नाही
महिलेने चौकशीदरम्यान एनआयएला सांगितले की, वाझेने मला एका कंपनीचे संचालक बनवले होते. परंतु, मला कंपनीच्या खात्यात 1.25 कोटी रुपये कोठून आले याची माहिती नाही. मला कंपनीतील व्यवहारांच्या बाबतीत काहीच माहित नव्हते. मी केवळ सचिन वाझेच्या सांगण्यावरुन सदरील चेकवर सही करायची असे महिलेने चौकशीच्या वेळी म्हटले आहे.
या प्रकरणातील आतापर्यंतचे आरोपी
एनआयएने 5 दिवसापूर्वीच दाखल केली होती चार्जशीट
राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्या 5 दिवसांपूर्वी या प्रकरणात चार्जशीट दाखल केली आहे. एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या 10 हजार कागदाच्या चार्जशीटमध्ये 10 जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी 45 लाख दिले असल्याचा दावाही एनआयएने आपल्या आरोपपत्रात केला आहे. विशेष न्यायालयाने एनआयएला 9 जून रोजी मनसुख हिरेन प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यासाठी 2 महिन्यांचा अवधी दिला होता. दरम्यान, तपास यंत्रणेने आतापर्यंत या प्रकरणात 150 लोकांची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.