आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात कल्याण मलंगगड रोडवरील एका दुकानावर 4 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सोने लुटण्याचा प्रयत्न केला.
मात्र, दुकानातील कर्मचाऱ्यांनी धाडसाने दरोडेखोरांचा प्रतिकार करत दरोडेखोरांना दुकानाबाहेर ढकलून दिले. एका दरोडेखोराने काउंटरमधून काही दागिने चोरून नेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
धारदार शस्त्राने हल्ला
कल्याण-मलंगगड रोडवर भाग्यलक्ष्मी ज्वेलर्स आहे. येथे मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ज्वेलर्सचे मालक कुमावत व दोन कर्मचारी दुकानात बसले असताना चार सशस्त्र दरोडेखोर अचानक दुकानात घुसले. दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात दोन कर्मचारी जखमी झाले.
काऊंटरमधून दागिने चोरले
एका दरोडेखोराने दुकान मालक कुमावत यांना पिस्तुलचा धाक दाखवून सोने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानातील दोन्ही कर्मचाऱ्यांनी धाडसाने दरोडेखोरांचा प्रतिकार करत त्यांना दुकानाबाहेर ढकलून दिले. झटापटीत एका दरोडेखोराने काऊंटरमधून काही दागिने चोरून नेले. यानंतर हे दरोडेखोर कारमधून पळून गेले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दरोडेखोरांच्या शोधासाठी 3 पथके
कर्मचारी व दरोडेखोराच्या हाणामारीत दरोडेखोराच्या पिस्तुलाचे बॅरेल दुकानातच पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सुधाकर पठारे, सहायक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड यांच्यासह उल्हासनगर विभागाचे सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेबाबत उल्हासनगरचे सहाय्यक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी सांगितले की, या घटनेत जखमी झालेल्या ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.