आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय युवासेना कोषाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमेय घोले हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अमेय घोले युवासेनेच्या व्हाट्सअॅप ग्रुपमधून लेफ्ट झाल्याची माहिती मिळत आहे. ते युवासेना कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थित राहीले.
जवळच्या लोकांमुळे नाराजी
युवासेना कोषध्यक्ष अमेय घोले यांनी युवासेना कोअर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती दर्शवली आहे. बैठकीचे निमंत्रण असूनही अमेय घोले अनुपस्थिती असल्याची माहिती आहे. अमेय घोले आदित्य ठाकरेंवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. अनेक दिवसांपासून अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींवर नाराज आहे.
नाराजी दाखवली बोलून
अमेय घोलेंनी ही नाराजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे बोलूनही दाखवल्याचं कळतंय. पण तरीदेखील याकडे वारंवार दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे अमेय घोले नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, याच व्यक्तींमुळे युवासेनेचं नुकसान होत असल्याचे अमेय घोले यांचे म्हणणे आहे.
आधीपासून चर्चा
अमेय घोले शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आज पहिल्यांदा नाही होत आहेत. यापूर्वीही अनेकदा अशा चर्चा रंगल्या होत्या. यापूर्वी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत केल्यानं ही चर्चा सुरू झाली होती. मात्र, आपण शिवसेनेतच राहणार असल्याचं घोले यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं.
कोण आहेत घोले?
अमेय घोले हे मुंबईतील वडाळा भागातील नगरसेवक आहेत. अमेय घोले हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. युवा सेनेच्या कोअर टीममध्ये घोले यांचा समावेश आहे. सध्या घोले नाराज असून ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत.
अमेय घोलेंचे स्पष्टीकरण
गणेशोत्सवा रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेय घोले यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागतही झाले होते. याबाबत अमेय घोले यांनी स्पष्ट केले होते की, मी पदाधिकारी असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भेटीसाठी आलो होतो. आदित्य ठाकरे यांचा माझ्यावर विश्वास असून मी शिवसेनेतच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.