आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाबरी'वरील वक्तव्य भोवले:चंद्रकांत पाटील यांच्यावर अमित शहा नाराज; प्रदेश भाजपमधूनही नाराजी व्यक्त

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे व शिवसैनिकांचा सहभाग नव्हता,’ असे वक्तव्य करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर प्रदेश भाजपमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे मंगळवारीच स्पष्ट केले होते. पाठोपाठ आमदार आशिष शेलार यांनीही ‘चंद्रकांत पाटील यांनी तसे बोलायला नको होते’ असे सांगत नाराजी व्यक्त केली. त्याबाबत शेलार यांनी अमित शहांना कळवले असल्याचे सांगितले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणुकीच्या ताेंडावर पाटील यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत, अशी तंबी त्यांना अमित शहांकडून देण्यात आली आहे.

भान ठेवून बोला : केसरकर

शिंदे गटाचे प्रवक्ते, शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याने भान ठेवून बोलायला हवे. त्यांनी बाळासाहेबांबाबत जे वक्तव्य केले आहे त्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शहांनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पाटलांचे कान टोचले आहेत. यापुढे बाळासाहेबांबद्दल बोलण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही.’