आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती बाप्पा मोरया:अमित शाह यांनी सहकुटुंब घेतले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपतीचे दर्शन

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या घरी विराजमान झालेल्या विघ्नविनाशक श्री गणाधिशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शहा यांना श्री गणेशाची मुर्ती भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे यांचे कुटुंबीय व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्यातील गणेशाचे अमित शहांनी घेतले दर्शन
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा बंगल्यातील गणेशाचे अमित शहांनी घेतले दर्शन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी अमित शहा सहकुटुंब पोहचले व गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना गणेश मूर्ती भेट दिली. आमच्या नेत्यांचा सहवास ही नेहमीच नवीन शिकण्याची प्रेरणा असते. मा. अमितभाई शाह यांना गणेशमूर्ती देऊन त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार पूनम महाजन, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार ॲड. आशिष शेलार, माजी मंत्री विनोद तावडे उपस्थित होते.

आशिष शेलार यांच्याही घरी गणपतीचे दर्शन
अमित शाह हे दरवर्षी मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. कोरोनामुळे गेली दोन वर्ष यात खंड पडला होता. पण यावर्षी पुन्हा एकदा मुंबईत येत त्यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी बाप्पाच्या चरणी डोकं टेकलं. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शाह भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याही घरी गणपतीचे दर्शन घेतले. याशिवाय, अमित शहा यांनी महालक्ष्मी देवीवरील एका पुस्तिकेचे प्रकाशन केले. तसेच त्यांनी मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून जवळपास 200 पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचा शहांनी निर्धार केला.

बातम्या आणखी आहेत...