आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चा तर होणारच:आपण लवकरच सत्तेत असू, मनसे नेते अमित ठाकरे यांचे कामगार मेळाव्यात मोठे वक्तव्य

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनीही सत्तेबद्दल मोठा दावा केला आहे. आपण लवकरच सत्तेत असू, असा दावा अमित ठाकरे यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कामगार दिनाचे औचित्य साधत कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुंबईत बोलताना हे वक्तव्य केले आहे.

अमित ठाकरे नेमके काय म्हणाले?

मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मेळाव्यात बोलताना म्हटले आहे की, आपण इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलोय. तुम्ही उगाच माझे नाव घेतात. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के काम होतात, कधी कामे होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामे पूर्ण होतील.

मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यावेळी बोलताना म्हणाल्या की, अमित राजकारणात आल्यापासून मी आळशी झाली आहे. मी इथे येणार नव्हते, पण केवळ तुमच्या कामाचे कौतुक करण्यासाठी मी इथेपर्यंत आले. सगळीकडेच कामगार कपात सुरू आहे, त्यात आपण कामगारांना न्याय देत आहोत. असे सांगतानाच पुढच्या वर्षी मी येणार नाही हा माईक अमितच्या हातात गेला पाहिजे असेळी त्सांनी यावेळी म्हटले आहे. बाकीच्यांची टीम 60 प्लस आहे. आपली टीम तरुण आहे. कठीण काळात तुम्ही कामगारांना न्याय मिळवून देत आहात. सगळ्यांनी चांगले काम केले आहे म्हणून एवढे युनिट वाढले आहेत.