आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशा वर्कर्स:‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अमित ठाकरेंचे अजित पवारांना पत्र 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून देण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेणार असल्याची माहितीही समोर आली आहे. अमित ठाकरेंनी आपले पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

अमित ठाकरेंनी लिहिले की,  'परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. आरोग्य सेवेच्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात अशी स्थिती असताना इतर राज्यांत मात्र ‘आशा’ स्वयंसेविकांना दर महिन्याला चार हजार ते दहा हजार रुपये इतका मोबदला मिळत आहे.'

'आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकट काळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. कामाचा मासिक मोबदला वाढवून मिळावा, ही त्यांची मागणी रास्त आहे.

त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावं, यासाठी त्यांना मिळणारा मोबदला त्वरित वाढवून देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं.' अशी माहिती अमित ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...