आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या पिढीतील वाद:एकनाथ शिंदेंनी बंड केले नसते, तर यात्रा काढली असती का? अमित यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेत बंड होण्याआधी मी दौरे सुरू केले आहेत. मात्र, शिंदेंचे बंड झाले नसते तर आदित्य ठाकरेंनी दौरा केला असता का, असा सवाल मनविसेचे प्रमुख् अमित ठाकरेंनी केला आहे.

अमित ठाकरे म्हणाले?

तेजस ठाकरे हे राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू आहे. ते जर राजकारणात सक्रिय होणार असतील तर त्यांचे स्वागत आहे. आगामी सर्व निवडणुका आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. येत्या निवडणुकीत आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण तयारी करायला हवी. निवडणुकीत जर काही मदत लागली तर मला सांगावे असे सांगताना प्रचारासाठी मलाही बोलवा आपण जोरदार प्रचार करू आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील या पद्धतीने कामाला लागण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. आजपासून अमित ठाकरे पुढील 4 दिवस नाशिक दौऱ्यावर असून आता मनपा निवडणुकीच्या प्रचाराची धुरा ते सांभाळणार असे दिसून येत आहे.

ठाकरे कुटुंब केंद्रस्थानी

गेला महिनाभर ठाकरे कुुटुुंब कोणत्या न कोणत्या कारणाने केंद्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे. शिंदेंनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. बंडखोरांच्या गटाने राज ठाकरेंशी चर्चा केली आणि मनसेने बहुमत सिद्ध करण्यासाठी शिंदे सरकारला पाठिंबाही दिला. सहसा पत्रकारांशी चर्चा न करणारे अमित ठाकरे मात्र पत्रकारांशी ऑफ रेकॉर्ड बोलताना गृहमंत्रीपद देत असले तर युती करु असे म्हणत चर्चेत आले होते. यानंतर त्यांनी आता आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरेंची दुसरी पिढी एकमेंकांविरोधात प्रचार करणार अशी चर्चा सुरू झाली आहे. अमित ठाकरे गेली 2 महिने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विद्यार्थी संघटनेची बांधणी करताना ठिकठिकाणी ते विद्यार्थी आणि तरुणांशी संवाद साधत आहेत. आज नाशिक दौऱ्यावर निघालेल्या अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

बातम्या आणखी आहेत...