आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी कोरोना निगेटिव्ह:अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, फेसबुक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. 22 दिवस नानावटी रुग्णालयात कोविड-19 वर उपचार करत असलेल्या अमिताभ बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. याची माहिती स्वतः अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांनी प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार मानले आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मी आता घरी आलो आहे. देवाच्या कृपेने, आई-वडिलांच्या आशीर्वादाने, मित्रांच्या आणि चाहत्यांच्या प्रार्थनांनी आणि मी प्रेमाने मी बरा झालो आहे. तसेच नानावटी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी आज हा दिवस पाहू शकलो आहे.

बातम्या आणखी आहेत...