आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महानायक कोरोना पॉझिटिव्ह:13 दिवसात पहिल्यांदा अमिताभ बच्चन यांनी दिली हेल्थ अपडेट, कोविड टेस्ट निगेटिव्हच्या बातम्यांवर लिहिले - हे बेजबाबदार आहे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 11 जुलैला नानावटी रुग्णालयात दाखल झाले होते अमिताभ बच्चन
  • अमिताभ आणि अभिषेकसोबतच ऐश्वर्या आणि आराध्याही रुग्णालयात आहेत

कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या वृत्तांचे महानायक अमिताभ बच्चन यांनी खंडन केले आहे. अमिताभ म्हणाले की, 'या चुकीच्या बातम्या आहेत, बेजबाबदार आणि खोटं आहे.' दरम्यान, हॉस्पिटल सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगण्यात आले होते की, अमिताभ बच्चन यांची कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आली असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे. परंतू, आता स्वतः अमिताभ यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

अमिताभ 12 दिवसांपासून मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. गुरुवारी पसरणाऱ्या अफवांबाबत पहिल्यांदाच त्यांनी प्रतिक्रिया दिली.

बुधवारी पुन्हा कोविड चाचणी घेण्यात आली

77 वर्षीय बिग बी आणि-44 वर्षीय अभिषेक व्यतिरिक्त ऐश्वर्या राय (46) आणि आराध्या (8) यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावरही नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी चौघांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली होती. रिपोर्ट अद्याप आलेला नाही.

बिग बींनी चिंता आणि अडचणींवर शेअर केली पोस्ट 
रुग्णालयात दाखल असतानाही अमिताभ बच्चन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. बुधवारी रात्री त्यांनी चिंता आणि अडचणींविषयी विचार शेअर केले. एक स्केच्ड फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की - 'खामोशी की तह में छुपा लो सारी उलझनों को, शोर कभी मुश्किलों को आसान नहीं करता!!"