आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बच्चन कुटुंबात कोरोना:अमिताभ यांनी अभिषेक, ऐश्वर्या, आराध्यासोबतचा फोटो शेअर करुन मानले चाहत्यांचे आभार, म्हणाले - आम्ही तुमचे प्रेम पाहत आहोत 

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ आणि अभिषेक यांना रुग्णालयात 8 दिवस झाले आहेत, त्यांची प्रकृती चांगली आहे
  • तब्येत बिघडल्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्याला शुक्रवारी संध्याकाळी रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले होते

अमिताभ बच्चन, त्याचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांना सध्या कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलच्या आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत आहे. दरम्यान, शनिवारी रात्री महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

अमिताभ यांनी अमिताभ, ऐश्वर्या आणि आराध्यासोबतचाएक फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'आम्ही तुमचे प्रेम बघत आहोत, आम्ही तुमच्या प्रार्थना ऐकत आहोत... तुमचे हात जोडून आभार...'

रुग्णालयात दाखल झालेल्या या सर्वांची प्रकृती वेगाने सुधारत असल्याचे शनिवारी सांगण्यात आले होते. वृत्तानुसार, हे सर्वजण कोविड -19 च्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. 77 वर्षीय अमिताभ आणि 44 वर्षीय अभिषेक 9 दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. शुक्रवारी रात्री 46 वर्षीय ऐश्वर्या आणि 8 वर्षाची आराध्या यांना तेथे दाखल करण्यात आले.