आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यकर्त्यांचे भान सुटलेय. त्यांच्या डोक्यात शेण भरलंय. भोग मात्र आमच्या वाट्याला आलेत. महापुरुषांच्या नखाची सर नसताना, अकलेचे तारे सोडणे सुरू आहे, अशा शब्दांत खासदार अमोल कोल्हे यांनी शनिवारी जोरदार टीका करत वाचाळवीरांचा समाचार घेतला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अजूनही शमत नाही. तोच अनेकांनी वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा सपाटा सुरूच ठेवलाय. या साऱ्यांचा समाचार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक कविता सादर करून घेतलाय. डॉ. कोल्हे यांनी सादर केलेली कविता अशी...
जागलेली माणसं,
वाचलेली पुस्तकं
रुजलेले विचार सारे
कुतूहलाने गोळा झाले
हे नवीन पुतळे,
ते नवीन बॅनर
एवढ्या अचानक कुठून आले?
पुतळ्यांच्या गळ्यात
चपलांचे हार प्रत्येक
बॅनरला जोड्यांचा प्रसाद
रुजल्या विचारांनी
आस्थेनं विचारलं, काय झालं?
पुन्हा कोणी समाज सुधारण्यासाठी
काम सुरू केलं?
प्रश्नासरशी
बॅनर्सने लाजेने
अंग गुंडाळून घेतले
पुतळ्यांनी तर
शरमेनं तोंड लपवलं
तरीही एका जागल्या माणसानं
त्यांची ओळख पटवली…
बॅनरवरील चेहरा पाहिला होता
भला मोठा हार घालताना
आवाजसुद्धा ऐकला होता
जोशपूर्ण भाषण ठोकताना
अरेच्चा… हे तर तेच महोदय…
हे तर ते, ते तर हे म्हणता म्हणता
सगळ्या चेहऱ्यांची ओळख पटली
निषेध, उद्वेग, संताप
सारं काही उमटलं होतं
प्रत्यक्षात जमत नाही म्हणूवन
बॅनर पुतळ्यांना कुटलं होतं
कळवळून शेवटी
एक पुतळा बोलला
जोडे खाऊन खाऊन
आम्हालाच कंटाळा आला..
डोक्यात शेण भरलंय त्यांच्या
अन् भोग मात्र आमच्या वाट्याला..
महापुरुषांच्या नखाचीही
सर नसताना
का जावं
अकलेचे तारे तोडायला
समाधानाने पुस्तकं फडफडली
चला, आमच्या शब्दांमध्ये जान आहे
राज्यकर्त्यांचं भान सुटलं
तरी जनतेला अजून जाण आहे…
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.