आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल कोल्हे यांचा 'बेळगावी' उल्लेखावर खुलासा:अनावधानाने बोललो, मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत होतो, राहीन!

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घाई गडबडीत आणि अनावधानाने बेळगावचा उल्लेख आपण बेळगावी असा केला, अशाप्रकारे दिलगीरी व्यक्त करत अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे.

अमोल कोल्हे यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन.

चुकीचा उल्लेख झाला

अमोल कोल्हे म्हणाले, येत्या 5 तारखेला बेळगावच्या राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण आहे, असे मला सांगण्यात आले आहे. म्हणून या कार्यक्रमाला मी येत होतो, परंतु या कार्यक्रमाच्या संदर्भात आता निपाणीमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याला जात असताना घाईमध्ये, अनावधानाने या प्रोग्रामसंदर्भात भाष्य करत असताना, बेळगावचा माझ्याकडून चुकीचा उल्लेख झाला, याबद्दल मराठी बांधवांच्या भावना दुखावल्या असतील, त्या सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माझी काय भूमिका आहे, ते आजतागायत सर्वांना माहिती आहे. मी आजही त्या भूमिकेवर ठाम आहे.

दिलगिरी व्यक्त करतो

अमोल कोल्हे म्हणाले, आपल्या सीमाभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभा राहतोय, म्हणून केवळ या कार्यक्रमाला येण्याचं मी कबूल केलं होतं. यामध्ये बेळगावचा माझ्याकडून जो माझ्याकडून अनावधानाने, घाईमध्ये चुकीचा उल्लेख झाला. त्याबद्दल मनापासून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या भावना दुखावल्यात्याबद्दल सर्वांची माफी मागतो.

बातम्या आणखी आहेत...