आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा इशारा:महाराष्ट्रात अमोल कोल्हेंचा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा कोल्हेंना इशारा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यावरुन राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. दरम्यान, हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. अशी भूमिका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे.

अमोल कोल्हे हे लोकप्रतिनिधी असल्याने गोडसेंना हिरो बनवण्याचे काम करू नये. याबाबत शरद पवारांनी लक्ष घालावे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे. झी 24 तास वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भूमिका मांडली.

काय म्हणाले पटोले?
अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते फक्त कलाकार नाहीत. विशेष करुन गोडसेच्या विचाराला ताकद मिळणे म्हणजे देशविघात व्यवस्थेला ताकद मिळण्यासारखे आहे. अशा प्रवृत्तीला समाजामध्ये हिरो बनवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर हे चुकीचं आहे. या देशाला फक्त महात्मा गांधींजीचा विचार तारु शकतो. त्याच विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्याने सिद्ध झालेले आहे, असे नाना पटोलेंनी या चित्रपटाला विरोध करताना म्हटले.

बातम्या आणखी आहेत...