आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''तुम्ही कितीही आंदोलने करा. आम्ही महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही. हे राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतेय.'' अशी टीका करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक फोटोही ट्विट केला व ''बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय'' असे लिहून राज्यपालांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
अमोल मिटकरींचा हल्लाबोल
अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, राज्यपालांनी ठरवलेलेच दिसतंय, आम्हीं महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या दैवताला किंमत देणार नाही, तुम्ही कितीही आंदोलने करा . बघा हा फोटो बरच काही दर्शवतोय.. पायात पायताण घालुन जर "शिवप्रतीमा" देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे?
राज्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य केली जात आहेत. या वक्तव्याचे राजकारण एकीकडे होत असतानाच महापुरुषांचा अवमान होत असल्याची भावना जनमानसांत आहे. राज्यपालांकडून मुंबईवर केलेले भाष्य असो की, शिवरायांबद्दल किंवा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावरील वक्तव्य ही त्यांची वक्तव्य वादग्रस्त ठरली.
राज्यपालांचे सावित्रीमाई फुलेंवरील वक्तव्य
राज्यपालांकडून यापुर्वी झालेल्या वक्तव्यावरुन रान पेटले. विरोधकांसह बहुतांश सर्वच राजकीय पक्षांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी केली जात असताना पुन्हा राज्यपालांवर एका प्रकारामुळे टीका झाली.
राज्यपालांचे छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्य
राज्यपालांच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्रातील जनताही रस्त्यावर उतरली. ठिकठिकाणी आंदोलनेही झाली. त्यानंतर आज पुन्हा राज्यपालांवर एका मुद्द्यावरुन टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी फोटो ट्विट करीत आपले मत व्यक्त केले.
राज्यपालांचे मुंबईबाबत वक्तव्य
तो फोटो व्हायरल
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतली. यावेळी शिवत्रपतींचा अर्धाकृती पुतळा योगींना भेट देण्यात आला. यावेळी दोघांच्याही पायात पादत्राने होती. त्यामुळे "शिवप्रतीमा" देत असाल आणि बाकी सर्व मुकसंमतीदर्शवित असतील तर या प्रकाराला काय म्हणावे? अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. हा फोटो त्यांनी ट्विट केला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.