आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच CM एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाचा गेम:फडणवीसांना CM करण्यासाठी भाजप आसुसलेला - अमोल मिटकरींची जहाल टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला कवडीचीही किंमत देत नाही.​ ​​​​​​लवकरच CM एकनाथ शिंदे, शिंदे गटाचा गेम होईल.'' असे भाकित करीत ''देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप आसुसलेले आहेत'' असे वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरमध्ये संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हायला पाहीजेत असे विधान केले होते या वक्तव्याचा अमोल मिटकरी यांनी खरपूस समाचार घेतला.

काय म्हणाले मिटकरी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर तिखट प्रतिक्रिया दिली. चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा अर्थ सोपा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी एक सभेत सांगितले होते, की देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत.

कवडीची किंमत नाही

अमोल मिटकरी ्म्हणाले, बावनकुळेंचे विधान जाऊ द्या, देवेंद्र फडणवीसांना काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेच बोलले होते की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री याचा अर्थ स्पष्ट आहे, एकनाथ शिंदे आणि शिंदे गट हा भाजपला शरण गेला आहे आणि भाजपच्या मनात देवेंद्र फडणवीसांनीच नेतृत्व करावे हेच आहे. याच याचा अर्थ ते एकनाथ शिंदेंना कवडीचीही किंमत देत नाहीत.

चंद्रशेखर बावनकुळेंचे ते विधान

''मी प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत”, असे ते म्हणाले आहेत. तेली समाजाचा हा कार्यक्रम होता आणि यासाठी मोठ्यासंख्येने ओबीसी प्रवर्गातील नागरिकांची उपस्थिती होती. दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य नाही

अमोल मिटकरी म्हणाले, उद्या नागपुरात अधिवेशन असताना आणि भाजप प्रदेशाध्यक्षांचे हे वक्तव्य याचा अर्थ स्पष्ट आहे, की त्यांना एकनाथ शिंदेंचे नेतृत्व मान्य नाही. लवकरच एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचा राजकीय गेम करून, देवेद्र फडणवीसांना ते परत त्या ठिकाणी सत्तारूढ करण्यासाठी आसूसलेले आहेत. मी कालही सांगितले की ज्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्या दिवशी हे सरकार कोसळलेले दिसेल.

ठिणगी पडली

अमोल मिटकरी म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेंचे वक्तव्य म्हणजे शिंदे सरकारसाठी ही ठिणगी आहे. संजय राऊत यांनीही सांगितलं होते की फेब्रुवारी महिना हे सरकार पाहणार नाही. त्याचाच अर्थ असा की, महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंना अजूनही मान्यता मिळाली नाही. चंद्रशेखर बावकुळेंनी एवढे कबूल करावे की, एकनाथ शिंदे यांचे सध्या नेतृत्व आहे. ही वस्तूस्थिती त्यांनी स्वीकारायला हवी.

बातम्या आणखी आहेत...