आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निकाल हाती येत आहेत. कोकणातील जागा भाजपने जिंकली तर भाजपचा गड असलेल्या नागपूरमध्ये मविआचा उमेदवार निवडून येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागपुरात पराभवाच्या खाईत पडलेल्या भाजपचे महाराष्ट्रातील मुख्य नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत सवालही केला आहे.
दया कुछ तो गडबड है!
अमोल मिटकरींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांची जादू कोकणात चालली, महाराष्ट्रात चालली , जगभरात चालली मात्र, नागपुर मध्ये का नाही चालली ? "दया कुछ तो गडबड है"
अमोल मिटकरींचे ट्विट
मग प्रत्येक निवडणुका बॅलेटवर घ्या
अमोल मिटकरी म्हणाले, कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले प्रथम त्यांचे अभिनंदन. EVM पेक्षा बॅलेट वर सुद्धा भाजप निवडणूक जिंकू शकते हे सिद्ध झाले. इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका भाजपाने EVM ऐवजी बॅलेट वर घेण्याचे औदार्य दाखवावे.
राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले त्या धर्तीवर अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांना खोचक सवाल करीत अपेक्षाही व्यक्त केली. भाजप सरकार आणि पक्षाचाही इव्हीएम मशीनवर मतदान करण्यावर भर आहे. परंतु, विरोधकांकडून मात्र, संशय घेतला जात होता. त्यावरुन काॅंग्रेस, राष्ट्रवादीनेही बॅलेटपेपरवर मतदान घ्यावे अशी मागणी केली होती. भाजप मात्र, इव्हीएमवर ठाम होते त्यामुळेच अमोल मिटकरींनी मागचे संदर्भ घेत टीकास्त्र सोडले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.