आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंबोज भाजपचा भोंगा:महाराष्ट्राचे वातावरण खराब करणे हाच त्यांचा धंदा; अमोल मिटकरींचा घणाघात

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहित कंबोज हा कुणी तत्ववेत्ता किंवा भविष्यकार नाही. हा प्रेस कॉन्फरन्स घेणार, काहीतरी जुने घोटाळे काढणार आणि महाराष्ट्राचे वातावरण खराब करणे हा त्याचा धंदा आहे. जीएसटी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर का तो बोलत नाहीत? असा सवाल करत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली.

पुढे ते म्हणाले की, मोहित कंबोज आहे कोण? तो कोणाच्या इशाऱ्यावर काम करतो, हे महाराष्ट्राला माहीत आहे. लष्करे देवेंद्रमधील हा तिसऱ्या फळीतील हा नेता आहे. हा भाजपाचा भोंगा आहे. ईडी आधी कुठे धाड ताकत असेल जर त्याला माहित असेल तर मोहित कंबोजची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. मोहित कंबोज ईडीचा चौकीदार आहे का? असा सवालही त्यांनी केला.

अजित पवारांवर त्याने आरोप केले. त्यापूर्वी किरीट सोमय्या आणि भाजपाने आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक यांचे पुढे काय झाले, याचे उत्तर आधी त्यांनी द्यावे, असे अमोट मिटकरी म्हणाले.

राष्ट्रवादी हा एक परिवार

पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादीत मोठा-छोटा असे काही नसते. राष्ट्रवादी हा एक परिवार आहे. त्याने पत्रकार परिषद घ्यावी, हा त्याचा अधिकार आहे. मात्र, वातावरण खराब करू नये. त्याला त्याच तोलमोलाचे उत्तर दिले जाईल. आज अजित पवारांनी बैठक बोलावली आहे. या सरकारविरुद्ध एक विरोधी पक्ष म्हणून आम्ही आक्रमक राहणार आहोत.

मोहित कंबोजांच्या ट्विटवरून वाद

भाजप नेते मोहित कंबोज यांनी कालपासून पुन्हा एकदा ट्विटसची मालिका सुरू केली आहे. या माध्यमातून मोहित कंबोज यांनी राज्यातील आणखी एका बड्या नेत्यावर कारवाई होण्याचे संकेत दिले. त्यांनी मंगळवारी रात्री केलेल्या ट्विटमध्ये सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. मोहित कंबोज यांच्या या वक्तव्याचा रोख अजित पवार यांच्या दिशेने असल्याचे म्हटले जाते.

बातम्या आणखी आहेत...