आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंग्यावरून मिटकरींचा सवाल:पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील- शक्तिपीठांवरील भोंगे उतरले, इतर धर्मीयांनाही फटका, हे पाप कुणाचं?

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेनं आंदोलन पुकारलंय. जोपर्यंत मशिदीवरील भोंगे बंद होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केली होती. भोंग्याच्या विषयावरुन सध्या राज्यात सुरु असलेल्या गोंधळाचा फटका शिर्डीच्या साई मंदिरापाठोपाठ आता थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला देखील बसला आहे. यावरून राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडेल. विठ्ठल मंदिरातील पंढरपुरमधील भोंगे खाली उतरले हे ऐकून वाईट वाटतय. हे पाप कुणाचं? असा सवाल त्यांनी केला.

शिर्डी, पंढरपुर ,त्र्यंबकेश्वर या धार्मिक पिठावरून काकडा आरती बंद झाली आहे. ग्रामीण भागातील 10 नंतर किर्तन सेवा बंद. कोरोनानंतर आता कुठे अखंड हरिनाम सप्ताह, प्रवचन, किर्तन, सुरळीत सुरु झाली होती. यात्रा महोत्सव सुरु झाले. मात्र या धार्मिक वातावरणाला या भोंग्यांमुळे छेद गेल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

पंढरपूर, तुळजापूर ही महाराष्ट्रातील शक्तीपीठे आहेत. चुकीच्या घाणेरड्या राजकारणामुळे हा फटका मुस्लिम,हिंदू व इतर धर्मियांनाही बसलाय. शेवटी विठ्ठल मंदिरातील पंढरपुरमधील भोंगे खाली उतरले हे ऐकून वाईट वाटतय. हे पाप कुणाचं? विचार करा, असेही मिटकरी यांनी म्हटले.

भजनाची परंपरा मागे पडेल -
महाराष्ट्रामध्ये श्रावण, आषाढी, कर्तिकी या महिन्यात धार्मिक वातावरण असते. यानिमित्त ग्रामीण भागात वारकरी व इतर भजनाची परंपरा आहे. रात्री 10 नंतर भोंग्याला परवानगी नसल्याने ही परंपरा मागे पडेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...