आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधारी-विरोधकांत वाद:शिवीगाळ केल्याचा मिटकरींचा आ. महेश शिंदेंवर आरोप, म्हणाले - ही गोष्ट लाजिरवाणी

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकात बुधवारी सकाळी जोरदार वाद झाला. विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदे गटातील आमदार महेश शिंदे यांच्यावर केला. तर अशा लोकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, विरोधकांनी आमची जागा हायजॅक केली होती. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होतं. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.

विधीमंडळाचे आजचे कामकाज सुरू होण्यापुर्वी विरोधकांकडून ‘पन्नास खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार विधीमंडळाच्या पायऱ्यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं चित्र होते. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली

अजित पवार म्हणाले -

पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा सत्ताधारी आमदारांच्या फार जिव्हारी लागली. त्यामुळेच सत्ताधारी शिंदे गटातील आमदारांकडून आमच्या अंगावर धावून येण्याचा प्रकार लाजीरवाणा आहे. अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.

काय म्हणाले आमदार मिटकरी...

मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमीका मांडणार होतो. परंतू विधी मंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधाऱ्यांच्या आमदाराकडून विरोध केला गेला आहे. आम्ही आंदोलन करून घोषणाबाजी करीत होतो. तेव्हा शिंदे गटातील आमदारांनी मला आम्हाला शिवीगाळ करून धक्काबुकी देखील केली आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना तक्रार केली आहे. एका अर्थाने विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सत्ताधारी आमदारांकडून केली जात आहे. आमच्या घोषणा यांना जिव्हारी लागल्याने हा प्रकार घडला आहे. महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या इतिहासात हा लाजीरवाणा प्रकार आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. अशा आमदारांवर कारवाई केली जावी, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

एका दृष्टीक्षेपात मिटकरींची पत्रकारपरिषद

  • पन्नास खोके आणि एकदम ओक्के असा वाक्य प्रचार प्रसिद्ध झाला आहे.
  • अप्रत्यक्ष रित्या माय-बहिणीवर आम्हाला शिव्या दिल्या आहेत.
  • या सभागृहाची प्रतिमा मलिन करायची नाही. आम्हाचा तसा विचार देखील नाही.
  • याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
  • तुमच्या गटातील आमदारांनी आम्हाला शिवीगाळ केली. धक्काबुकी केली. एवढे करून देखील ते या ठिकाणी येवून पुन्हा अंगावर येसाल तर शिंगावर घेऊ, अशी भाषा वापरत आहे. ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्टी आहे.
  • याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य ती कारवाई करतील असा विश्वास आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

नेमका काय घडला प्रसंग

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकमेकांच्या अंगावर धावले व त्यांच्यात धक्काबुक्कीही झाल्याचे दिसून आले. शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

कुणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ- गोगावले

विधान भवनाच्या पायऱ्यांवर राडा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विरोधकांनी आमच्यावर आरोप केले. म्हणून त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही आंदोलन केले. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेऊ, असे ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असा इशाराच त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...