आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हउमेश कोल्हे हत्याकांड:तबलिगी जमातच्या 11 जणांनी कट रचून नेला तडीस; मौलाना मुशफिक मुख्य मास्टरमाइंड

विनोद यादव। मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'एनआयए'ने 21 जून 2022 रोजी अमरावती येथे फार्मासिस्ट उमेश प्रल्हाद कोल्हे (54) यांची निर्घृणपणे हत्या करून देशभरात जातीय उन्माद पसरवण्याचा कट उघड केला आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या खून प्रकरणात एडिशनल सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस (एनआयए, मुंबई) बजरंग बनसोडे यांनी सुमारे 137 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

'एनआयए'ने 177 साक्षीदारांकडून सविस्तर माहिती घेत उमेश कोल्हे हत्याकांडात एकूण 11 जणांना आरोपी बनवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे उमेश कोल्हे हत्याकांडातील सर्व आरोपी तबलिगी जमातचे आहेत. देशाला हादरवून सोडणाऱ्या उमेश कोल्हे खून प्रकरणातील 11 आरोपींची भूमिका अशी...

1) मुदस्सीर अहमद उर्फ ​​सोनू रझा :

उमेश कोल्हे यांची हत्या करण्यापूर्वी भाजीविक्रेत्याचे काम करणाऱ्या सोनू रझा याने अन्य आरोपींसोबत रेकी केली. या आरोपीने इतर आरोपींना कोल्हेच्या हालचालीची माहिती दिली. त्यानंतर ही निर्घृण हत्या करण्यात आली. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचे समर्थन करणारे 'जय मोबाईल शॉप'चे मालक जयकुमार आच्छाड यांनाही या आरोपींनी धमकावले होते.

2) शाहरुख खान उर्फ शाहरुख पठाण उर्फ बादशाह :

हा आरोपी अमरावती येथे इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि ड्रायव्हर म्हणून काम करायचा. उमेश कोल्हे खून प्रकरणाचा कट रचताना तो रेहेबर हेल्पलाइनचा चालक होता. खुनाच्या दिवशी प्रभात चौकातील अमित मेडिकल स्टोअरजवळ आरोपी निळ्या रंगाच्या बजाज कॅलिबर दुचाकीने रेकी करण्यासाठी गेला होता. उमेश कोल्हे खून प्रकरणातील दहशतवादी टोळीचा सदस्य इरफान भाईच्या सांगण्यावरून हा आरोपी सक्रिय होता.

3) अब्दुल तौफिक शेख उर्फ अब्दुल तौफिक उर्फ नानू :

फॅब्रिकेशन आणि वेल्डिंग कामगार अब्दुल तौफिक 20 जून 2022 रोजी साबुनपुरा (अमरावती) येथे खून प्रकरणात सहभागी असलेल्या इतर दोन आरोपींना भेटला. अब्दुल तौफिक याने अतिब रशीद उर्फ ​​रशीद या आरोपीसोबत 20 जून रोजीच उमेश कोल्हे याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. यासाठी तो अतीब रशीदच्या दुचाकीवर बसून अमित मेडिकल स्टोअर जवळ रेकी करण्यासाठी गेला होता. परंतु काही कारणांमुळे 20 जून 2022 रोजी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट आरोपींना अंमलात आणता आला नाही.

4) मोहम्मद शोएब उर्फ शोएब खान उर्फ भुर्या उर्फ भुरू

हा आरोपी कामगार हेल्पर म्हणून काम करतो. उमेश कोल्हे यांच्या हत्येच्या कटाची पहिली बैठक 19 जून 2022 रोजी गौसिया हॉलमध्ये झाली. या बैठकीला शोएब खानही उपस्थित होता. चाकूसारख्या धारदार शस्त्राने एखाद्या व्यक्तीचा गळा कसा निर्दयीपणे कापला जातो.या आरोपीने त्याचा सराव केला होता. 20 जून रोजी हा आरोपी इतर आरोपींसोबत उमेश कोल्हे यांना मारण्यासाठी घंटाघर मार्गावर गेला होता, मात्र त्या दिवशी खून होऊ शकला नाही. त्यानंतर 21 जून रोजी या आरोपीने अन्य दोन आरोपींसोबत होंडा साईन बाईकवरून उमेश कोल्हे यांच्याकडे जाऊन त्यांना चुकीच्या मार्गाने रोखले आणि नंतर गळा चिरून निर्घृण हत्या केली. कोल्हे खून प्रकरण घडवून आणत असताना आरोपींनी त्यांचा मोबाईल रेहबर एम्ब्युलन्समध्ये ठेवला होता. जेणेकरून पोलिसांना त्यांची शारीरिक उपस्थिती कळू शकणार नाही.

5) अतिब रशीद उर्फ रशीद

'एनआयए'ने आरोपपत्रात अतीब रशीदला या हत्येचा मास्टरमाईंड म्हटले आहे. नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानानंतर अमरावतीत 'गुस्ताखी नबी की एक ही सजा… सर तन से जुदा… सर तन से जुदा' या आरोपीने ही घोषणा व्हायरल केली. त्यानंतर नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या उमेश कोल्हेच्या हत्येचा कट रचण्यात आला. दुग्ध व्यवसायाशी संबंधित असलेल्या रशीदने उमेश कोल्हेचा संदेश दाखवून इतर आरोपींना खुनासाठी प्रवृत्त केले.

6) युसुफ खान उर्फ डॉ. युसूफ खान

पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या युसूफ खान हा पहिलाच माणूस होता. ज्याने रशीदसोबत उमेश कोल्हेच्या हत्येचा कट रचला. हा आरोपी कोल्हे यांच्या ‘ब्लॅक फ्रीडम’ या व्हॉट्सएप ग्रुपचा सदस्य पण होता. या व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपमध्ये उमेश कोल्हेने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ एक मेसेज पोस्ट केला होता. त्यानंतर डॉ.युसूफ खानने लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचला. या आरोपीने 'कलीम इब्राहिम'सह अनेक मुस्लिम व्यक्ती आणि संस्थांच्या ग्रुपमध्ये अमेश कोल्हेचे मेसेज व्हायरल केले.

7) इरफान खान उर्फ इरफान भाई

हा आरोपी मरावती जिल्ह्यात इस्टेट एजंट आणि सेकंडहँड गाड्या खरेदी-विक्रीचे काम करायचे. इरफान भाई “मीटिंग ओन्ली” व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपला एडमिन पण होता. उमेश कोल्हे यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्यात आली होती. या आरोपीने उमेश कोल्हे खून प्रकरणातील इतर आरोपींना लपण्यासाठी मदत केली, त्यांना पैसे दिले आणि खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली.

8) अब्दुल अरबाज

इरफान भाईसोबत हा आरोपी उमेश कोल्हे खून प्रकरणात सहभागी झाला. 20 जून रोजी रात्री 11 वाजता उमेश कोल्हे यांच्या हत्येचा पहिल्या कटातही अन्य आरोपींसोबत अब्दुल अरबाजही उपस्थित होता. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर हा आरोपी अमरावतीच्या जनरल रुग्णालयातही गेला होता. येथून या आरोपीने अन्य आरोपींना कोल्हे जिवंत आहे की मेला याबाबत माहिती दिली. उमेश कोल्हेच्या हत्येनंतर या आरोपीने मुदस्सीर अहमद यांना धामणगाव, शोएब खान आणि शाहीम अहमद यांना पराठवाडा परिसरात आपल्या कारमधून सोडले. इरफान खानच्या सांगण्यावरून व्यवसायाने मेकॅनिक असलेल्याया आरोपीने इतर आरोपींना महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये लपण्यासाठी मदत केली.

9) मुशफिक अहमद उर्फ मौलाना मुशफिक उर्फ मौलवी मुशफिक

या आरोपीने “मीटिंग ओन्ली” व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. मौलाना मुशफिक हा उमेश कोल्हे खून प्रकरणाचा मुख्य मास्टरमाइंड आहे. या आरोपीने हत्येसाठी इतर आरोपींना निधी उपलब्ध करून दिल्याचा एनआयएचा आरोप आहे. याशिवाय या आरोपीने हत्येनंतर आरोपींना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

10) शेख शकील

कार ड्रायव्हर शेख शकील हा संपूर्ण हत्याकांडात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहभागी होता. हत्येनंतर या आरोपीने इतर आरोपींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आणि त्यांना लपविण्यात मदत केली. नुपूर शर्माला पाठिंबा देणाऱ्या जयकुमार आच्छाडला धमकवण्यात शेख शकीलचाही हात होता. उमेश कोल्हेच्या हत्येनंतर आरोपींनी स्कोडा कारची व्यवस्था केली आणि स्वतः गाडी चालवत इतर आरोपींना पळून जाण्यास मदत केली. या आरोपीने गुन्हेगारी घटनेत वापरलेला मोबाइल इरफान भाईला पुरवला होता.

11) शाहिम अहमद उर्फ शाहीम अहमद, मोनू

उमेश कोल्हे यांच्यावर या आरोपीने २१ जून रोजी चाकूने हल्ला केला होता. हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणण्यासाठी शोएब खान आणि अतीब रशीद यांनी आपल्या टोळीत सामील करून घेतले होते. उमेश कोल्हे खून प्रकरणात वापरलेले मोबाईल, चाकू, स्कार्फ आदी पुरावे नष्ट करण्याचे काम या आरोपीने केले.

बातम्या आणखी आहेत...