आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीसांचा ​​​​​​​संजय राऊतांना अप्रत्यक्ष टोला:ट्विट करत म्हणाल्या- 'आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है!'

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या आधीच अनेक शिवसैनिक मुंबईमधील शिवसेना भवनाजवळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राऊत यांनी ईडी, भाजपा नेते, किरीट सोमय्या यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही संजय राऊतांवर खोचक निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीसांनी संजय राऊतांचे थेट नाव न घेता त्यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे. 'आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है', असे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले आहे.

राऊत म्हणाले, हा ट्रेलर होता...

कोणत्याही परिस्थिती महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहील. 2024 मध्ये देशात परिवर्तन होईल, मला जे बोलायचे होते ते बोललो. कहाणी अभी पुरी नही हूई, हा ट्रेलर, येत्या काळात काही व्हिडिओ, डॉक्युमेंट समोर आणेन. दिल्लीला जा किंवा ज्यो बायडेन यांच्याकडे जा, माझे आयुष्य संघर्षात गेले, बाळासाहेबांचा आशिर्वाद आहे आमच्या पाठिशी, असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...