आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिसेस फडणवीस ट्रोल:‘फोटो लेते रहो..’अमृता फडणवीस पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर, सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो ठरले कारण 

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्याच्या संदर्भातील या कार्यशाळेत सहभागी झाल्या असताना टेबलवरील एका कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळे ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीससोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते चर्चेत आल्या. यानंतर त्या अनेक कारणामुळे चर्चेत येत असतात. सोशल मीडियावर त्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होतात. आता पुन्हा एकदा त्या ट्रोल झाल्या आहेत. यासाठी एक फोटो हा कारणीभूत ठरला आहे. 

  अमृता फडणवीस यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कम्युनिटी हेल्थ सर्व्हिस 2019-20 अंतर्गत वर्कशॉपमध्ये अमृता फडणवीस सहभागी झाल्या होत्या. वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. तसेच समाजोपयोगी आरोग्य उपक्रमाची गरज आणि परिणाम याबाबत त्यांनी डॉक्टरांशी चर्चा त्यांनी केली. दरम्यान त्यांनी सोशल मीडियावर वेबिनारचे फोटो शेअर केले आहे. यामधील एका फोटोमुळे त्या आता ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. 

आरोग्याच्या संदर्भातील या कार्यशाळेत सहभागी झाल्या असताना टेबलवरील एका कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळे ट्रोलर्सनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अमृता फडणवीस वेबिनारमध्ये सहभागी झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या बाजूलाच एक कागद दिसतोय. त्यावर पुसटसं काहीतरी लिहिलेलं दिसत आहे. हा फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्यावर 'फोटो लेते रहो' हे शब्द दिसत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser