आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस फडणवीसांची टीका:अमृता फडणवीसांनी शिवसेनेचा 'शवसेना' असा केला उल्लेख, म्हणाल्या - 'शिवसेनेने आपल्या साथीदारांना बिहारमध्ये ठार मारले'

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेनेचे 22 उमेदवार होते.

बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यांनी आपली सत्ता ही कायम राखली आहे. दरम्यान बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी असलेले राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. त्यांचीच एक मुलाखत शेअर करत मिसेस फडणवीसांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी 'शवसेना' असा उल्लेख केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात शिवसेनेचे 22 उमेदवार होते. मात्र या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली. यावरुन अमृता फडणवीसांनी निशाणा साधला आहे. मिसेस फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर करत शिवसेनेला टोला लगावला. यामध्ये फडणवीसांनी शिवसेनेने कशाप्रकारे बिहारमधील निवडणुकीमध्ये खराब कामगिरी करुन आपले हसू करुन घेतले या विषयावर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधीतरी बिहारमध्ये काही जागा निवडून यायच्या मात्र आता तेही झालं नसल्याचे म्हणत शिवसेनेबरोबर सध्या सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीलाही टोला लगावला आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या की, 'का हय ये - शवसैना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार मे ! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहार मधे ! महाराष्ट्र कुठे ही नेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेउन ठेवल्या बाबत धन्यवाद ' असे म्हणत अमृता फडणवीसांनी टोला लगावला.

नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. शिवसेनेकडून 22 उमेदवार उभे होते, या निवडणुकीत शिवसेनेच्या 21 उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान मिळाले. बिहारमध्ये शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, 1 टक्केही मतदान शिवसेनेला झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...