आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना निर्बंधात शिथिलता:अमृता फडणवीस पुण्यात! म्हणाल्या- दुकाने उघडली नाही तर तुम्ही आंदोलनावर बसा, इतर शहरे खुली होत असताना पुण्यातच बंधने का?

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दबाब आणण्यासाठी धरणं आंदोलन करा - अमृता फडणवीस

देशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. राज्य सरकारने ज्या जिल्ह्यांत कोरोनाचे दर कमी आहे अशा जिल्ह्यांना कोरोना निर्बंधात शिथिलता दिली आहे. परंतु, राज्यातील 11 जिल्ह्यांत अजूनही कोरोनाचे नियम तसेच आहे. त्यामध्ये राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पुण्यातील हातमाग प्रदर्शनाचं उदघाटन केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, पुण्यातील कोरोनाचा दर अतिशय खाली आला आहे. लोक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहे. राज्य सरकारने अनेक जिल्ह्यांत कोरोना नियमात शिथिलता दिली. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला एक न्याय हे चुकीचे आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथे सर्वकाही सुरळीत होण्याची गरज असल्याचे चिंता त्यांनी यावेळी व्यक्त केली.

दबाब आणण्यासाठी धरणं आंदोलन करा - अमृता फडणवीस
राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना निर्बंधामुळे कमी वेळेत जास्त गर्दी असून यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकार काही जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करत असताना पुण्यात काय अडचण आहे अस संतप्त सवाल ही त्यांनी यावेळी केला. सरकारवर दबाव आणण्यासाठी धरण आंदोलन करा असे त्यांनी उपस्थित लोकांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...