आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबला अटक:'...कम्बख़्त उसूलों पे चला होगा', अर्णब गोस्वामीच्या अटकेनंतर अमृता फडणवीसांनी ट्विट करत केला विरोध

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये अर्णब गोस्वामीचे नाव होते.

आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. भाजपने राज्य सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही भाष्य केले आहे. त्यांनी अर्णबच्या अटकेचा विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी याविषयावर ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक शेर ट्विट करून अर्णब गोस्वामी गोस्वामीला पाठिंबा दिला आहे. "बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!" असे म्हणत अमृता फडणवीसांनी अर्णबला पाठिंबा दर्शवला. या ट्विटमध्ये त्यांनी काही हॅशटॅग वापरले आहे. यामध्ये ArnabGoswami, MaharashtraGovt, Death Of Democracy असे लिहिण्यात आलले आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, 'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.'

काय आहे प्रकरण?
2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाइड नोटमध्ये अर्णब गोस्वामीचे नाव होते. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.