आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Amrita Fadnavis's Security Wasted Lakhs Of Rupees, Without Helping The Distressed Farmer, The Government Is Busy Preserving Dynastic Rule

अमृता फडणवीसांच्या सुरक्षेत लाखो रुपये वाया:शेतकऱ्याला मदत न करता, घराणेशाही जपण्यात सरकार व्यस्त- 'आप'चा सरकारवर घणाघात

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे - फडणवीस सरकार सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. जनतेला भेडसावणा-या ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, याकडे सरकारचे लक्ष नसून ईडी सरकार घराणेशहीत व्यस्त असल्याची टिका आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

राज्य अधोगतीला

या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. त्यात महाराष्ट्रतील उद्योग राज्याबाहेर नेले जात ही अत्यंत दुदैवी बाब आहे. त्यात दुसरीकडे परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. पीके हातात येण्याच्या आधीच वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना मुंबईकरांच्या कराचा पैसा घराणेशाहीत वाया जात आहे अशी टिका आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष संदीप कटके यांनी केली.

बेरोजगारी वाढली

कोरोना महामारी मुळे राज्यातील प्रत्येक वर्ग हवालदील झाला असून बेरोजगारीची संख्या वाढत जात आहे. अश्यातच ईडी सरकार महाराष्ट्रतील रोजगार राज्याबाहेर नेत नसून सरकार तरुणाच्या तोंडचा घास काढून घेत आहे, ही अत्यंत दुदैवी बाब आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी घरणेशाहीत व्यस्त न होता राज्याच्या तरुणांच्या प्रश्नांनाकडे बघावे अशी टिका आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष पायास वर्गीस यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...