आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राऊतांवर टीका:नॉटी पुरुषांच्या आचार-विचारांची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यास मदत करा, अमृता फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगनाच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली होती. कंगना रनोट म्हणजे नॉटी गर्ल असल्याचे म्हटले होते.

अमृता फडणवीस राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर त्या भूमिका मांडत असतात. यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. आजही आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाचे निमित्त साधत अमृता फडणवीस यांनी ट्विट केले आहे. 'नॉटी पुरुषांच्या आचार-विचारांची घाण घालवून महाराष्ट्र स्वच्छ करण्यास मदत करा' असे आवाहन अमृता फडणवीसांनी केले आहे. संजय राऊतांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला आहे.

आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिवसही आहे. यानिमित्ताने अमृता फडणवीसांनी एक ट्विट केले. ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, 'आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस आणि आंतरराष्ट्रीय शौचालय दिवस आहे. या दिवशी सर्व देशभक्त पुरुषांना, एक सामान्य महिलेकडून मी निवेदन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ ठेवण्यात मदत करावी'

नॉटी पुरुष का म्हणाल्या?

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण आणि सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण चर्चेत होते. यावेळी अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना केली होती. यानंतर संजय राऊत आणि कंगना वाद पेटला होता. कंगनाच्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कंगनावर टीका केली होती. कंगना रनोट म्हणजे नॉटी गर्ल असल्याचे म्हटले होते. त्याचा खुलासा करताना 'हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असे मला वाटते असे स्पष्टीकरण राऊतांनी दिले होते.

बातम्या आणखी आहेत...