आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीसांची टीका:मुख्यमंत्र्यांना धमक्या येणे देशाची अवस्था सांगत नाही, काही लोकांच्या खराब डोक्याची व्यवस्था दिसून येते

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्र्यांना धमक्या येणं देशाची अवस्था सांगत नाही. काही खराब डोक्याच्या लोकांच्या दिमाखाची व्यवस्था मात्र यातून दिसून येते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर केली.

मुख्यमंत्री शिंदे यांना धमक्या येत आहेत यावरून देशाची, राज्याची अवस्था बिघडलेली आहे असे वाटते, असे वक्तव्य काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्याला अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नवरात्रोत्सवात गाणे गायले

डोंबिवलीमध्ये दोन गरबा उत्सवांना अमृता फडणवीस यांनी सोमवारी उपस्थिती लावली होती. यावेळी उत्सवात अमृता यांनी गाणे गायले तसेच, ढोलही वाजवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिले.

ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गेश्वरी देवीची पूजा अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीसांनी केली.
ठाण्यातील मानाच्या टेंभीनाका येथील जय अंबे माँ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या दुर्गेश्वरी देवीची पूजा अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीसांनी केली.

काही डोकी खराब

अमृता फडणवीस म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांना येणारी धमकी ही देशाची अवस्था सांगत नाही. मात्र, काही लोक वेगळ्या डोक्याचे आहेत. त्यांची मानसिकता त्यात दिसून येते. मला वाटतं धमकी देणारे हे त्यांच्यातीलच काही लोक असू शकतात. आपल्याला काय माहिती. मात्र यातून देशाची व्यवस्था नव्हे तर, काही खराब डोक्याच्या लोकांच्या दिमाखाची व्यवस्था दिसून येते.

प्रगतीचे राजकारण पाहीजे

हस्तक्षेप केला असता तर दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाला असता, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी केले आहे. यावर नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंनी मन मोकळं ठेवावं आणि सत्ता देऊन टाकावी, असा टोला लगावला आहे. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, काय म्हणू याच्यावर? मुख्यमंत्री शिंदे हे चांगले काम करत आहेत. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद दान करतील असे वाटत नाही. तसेच, आगामी मुंबई पालिका निवडणुकीवर अमृता फडणवीस म्हणाल्या, पोटनिवडणुका असो की बीएमसी निवडणुका आपल्याला प्रगतीचे राजकारण पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...