आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Amruta Fadnavis Uddhav Thackeray | Amruta Fadnavis Says Any Man Who Must Show I Am The King’ Is No True King, Targets CM Uddhav Thackeray In Narayan Rane Row

अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत:ज्या माणसाला 'मी राजा आहे' हे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच! अमृता फडणवीसांनी घेतला उद्धव ठाकरेंना चिमटा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडी सरकार विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे असा वाद सुरू आहे. याच वादात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली. त्यांनी एक ट्विट करून खरा राजा कसा असतो याचा अर्थ सांगितला. ज्या माणसाला मी राजा आहे असे दाखवावे लागते तो खरा राजा नसतोच असे अमृता फडणवीस यांनी लिहिले आहे. अर्थातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर लगेच त्यांना ट्रोल करणाऱ्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. त्यांनी हा टोला घरचा आहेर म्हणून फडणवीसांनाच लगावला असेल असे एकाने म्हटले. तर काहींनी त्यांच्या गायणावरून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. अमृता फडणवीस यांनी ट्विट इंग्रजीत केले. त्यावरूनही लोकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

भाजपकडून राणेंची पाठराखण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानाचे भारतीय जनता पक्षाकडून समर्थन करण्यात आले आहे. अर्थातच कानाखाली लगावणे किंवा थोबाडीत मारणे हा सामान्य संवाद आहे असे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पाटील बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की 'राणेंचे वाक्य चुकलेले नाही, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद आहे. उद्धव ठाकरे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहेत हा संदर्भ देताना चुकले. यावर राणे साहेब मी शेजारी असतो तर थोबाडीत मारली असती असे म्हणाले होते. मात्र हा कॉमन संवाद आहे. ते थोबाडीत मारायला मातोश्रीवर जाणार, शोधून थोबाडीत मारणार आहे असे ते म्हणाले होते का?' असे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यावर नारायण राणे यांना मंगळवारी नाशिक पोलिसांनी अटक केली नंतर जामिनावर सुटका त्यांचीही सुटकाही करण्यात आली. मात्र तरी देखील राणेंच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता नाशिक पोलिसांनी आपल्याकडे दाखल एका केसमध्ये नारायण राणेंना नोटीस पाठवून त्यांना 2 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...