आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं:परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलल्याशिवाय युती शक्य नाही, मनसे-भाजप युतीच्या प्रश्नाला रावसाहेब दानवेंनी दिला पूर्णविराम

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज ठाकरे आणि भाजपची युती सध्या तरी शक्य नाही. जौपर्यंत ते परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत युती शक्यच नाही अशी स्पष्टोक्ती भाजप नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या प्रश्नावर तुर्तास पडदा पडला आहे. नितीन गडकरी यांनी नुकतीच राज ठाकरेंची भेट घेतली आणि ही भेट वैयक्तिक होती हे त्यांनी स्पष्ट केले होते आता मीही राज ठाकरे यांची अधिवेशन झाल्यानंतर भेट घेणार आहे ही भेट राजकीय नसून वेगळ्या कामासाठी असणार आहे, असेही दानवे म्हणाले. हे सांगतानाच त्यांनी मुंबई महापालिकेवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा दावाही केला. रावसाहेब दानवे कोणत्या कामासाठी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत व ते वेगळे काम कोणते असा प्रश्नही अशी उत्सुकताही आता जनतेला लागली आहे.

शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे. पण सी टीम म्हणून हिनवले जात असलेल्या मनेसचे भाजपकडून कौतूक होत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप युती होणार का असा प्रश्न समोर येत असतानाच याच प्रश्नाला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उत्तर दिले असून राज ठाकरे परप्रांतीयांच्या धोरणात जोपर्यंत बदल करत नाहीत, तोपर्यंत युती शक्य नाही अशी भूमिका रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.

मी लवकरच राज ठाकरेंना भेटणार

मनसे आणि भाजप युतीबद्दल बोलताना दानवे म्हणाले की, होणार या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की लवकरच माझी आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे. ही भेट राजकीय असणार नाही, परंतु वेगळ्या विषयावर चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांच्या भाषणावरून शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे, आता घरातूनच आवाज उठायला लागला असा कयास काढत त्यांनी शेलक्या शब्दात शिवसेनेवर टीका केली. हे सांगतानच त्यांनी राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने येत असल्याचेही निरीक्षण त्यांनी नोंदविले.

युपीए अध्यक्षपदाचा ठराव राष्ट्रवादीनेच केला

एकीकडे यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पण दुसरीकडे यूपीएच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीनेच ठराव केला आहे अशी दुटप्पी भूमिकाही रावसाहेब दानवे यांनी लक्षात आणून दिली.

बातम्या आणखी आहेत...